Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Money > बिझनेस न्यूज > पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?

पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?

LPG Cylinder : देशातील सरकारी पेट्रोल पंपांवर इंधनाचे दर स्थिर असले तरी खाजगी पेट्रोल पंपांनी दरात मोठी वाढ केली आहे. यानंतर आता गॅस सिलेंडरचे दरही वाढण्याची शक्यता आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 5, 2026 11:14 IST2026-04-05T11:11:04+5:302026-04-05T11:14:40+5:30

LPG Cylinder : देशातील सरकारी पेट्रोल पंपांवर इंधनाचे दर स्थिर असले तरी खाजगी पेट्रोल पंपांनी दरात मोठी वाढ केली आहे. यानंतर आता गॅस सिलेंडरचे दरही वाढण्याची शक्यता आहे.

LPG Tanker 'Green Saanvari' Safely Crosses Strait of Hormuz with 46,650 Tonnes of Gas | पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?

पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?

LPG Cylinder Price : पश्चिम आशियातील युद्धजन्य परिस्थितीमुळे विस्कळीत झालेल्या एलपीजी पुरवठ्याबाबत भारतासाठी एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. इराण आणि इस्रायलमधील संघर्षाच्या केंद्रस्थानी असलेल्या 'स्ट्रेट ऑफ होर्मुज'मधून भारतीय एलपीजी टँकर 'ग्रीन सांवरी' यशस्वीरीत्या बाहेर पडला आहे. सुमारे ४६,६५० टन एलपीजी साठा असलेला हा टँकर आता भारताच्या दिशेने मार्गस्थ झाला असून, यामुळे देशातील गॅस टंचाईचे सावट काही अंशी कमी होण्याची चिन्हे आहेत.

युद्धभूमीतून यशस्वी प्रवास
२८ फेब्रुवारी रोजी अमेरिका आणि इस्रायलने इराणवर केलेल्या हल्ल्यानंतर 'स्ट्रेट ऑफ होर्मुज' हा जलमार्ग अत्यंत धोकादायक बनला होता. 'ग्रीन सांवरी' हा होर्मुजची सामुद्रधुनी ओलांडणारा सातवा भारतीय एलपीजी टँकर ठरला आहे. या टँकरमधील ४६,६५० टन एलपीजी भारताच्या निम्म्या दिवसाची गरज पूर्ण करण्यास सक्षम आहे. दरम्यान, इराणहून आलेले आणखी एक मालवाहू जहाज मंगळूर बंदरात दाखल झाले असून, लाल समुद्रातील तणावानंतरही इंधनाचा पुरवठा सुरू असल्याचे हे संकेत आहेत.

गॅस सिलिंडरचे 'भडकलेले' दर
पुरवठा सुरू असला तरी जागतिक बाजारपेठेतील दरवाढीचा फटका सर्वसामान्यांना बसला आहे. १ एप्रिल रोजी व्यावसायिक सिलिंडरच्या दरात १९५.५० रुपयांची मोठी वाढ करण्यात आली आहे.

प्रमुख शहरांतील घरगुती (१४.२ किलो) आणि व्यावसायिक (१९ किलो) सिलिंडरचे दर

शहर घरगुती सिलिंडर (रुपये) व्यावसायिक सिलिंडर (रुपये) 
मुंबई ९१२.५० २,०३०.५० 
पुणे ९६०२,०४५.०० 
दिल्ली ९१३.०० २,०७८.५० 
कोलकाता ९३९.०० २,१९२.५० 
चेन्नई ९२९.०० २,२४३.५० 

वाचा - पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती

पुरवठ्यातील अनिश्चितता आणि चिंता
सरकारने पुरवठा सुरळीत ठेवण्याचे प्रयत्न सुरू ठेवले असले तरी, अनेक भागांत अनियमित पुरवठ्यामुळे ग्राहकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. व्यावसायिक सिलिंडर दोन हजार रुपयांच्या पार गेल्याने हॉटेल व्यावसायिक आणि छोट्या दुकानदारांचे बजेट कोलमडले आहे. घरगुती गॅसच्या किमतीतही ७ मार्च रोजी ६० रुपयांची वाढ झाल्याने गृहिणींचे गणित बिघडले आहे.

Web Title : पेट्रोल-डीजल के बाद गैस सिलेंडर के दाम बढ़े; नवीनतम दरें जांचें।

Web Summary : एलपीजी की कीमतें बढ़ीं, जिससे घर और व्यवसाय प्रभावित हुए। एक सफल टैंकर मार्ग के साथ आपूर्ति संबंधी चिंताओं के कम होने के बावजूद, वाणिज्यिक सिलेंडर की दरों में काफी वृद्धि हुई है, जो कुछ शहरों में ₹2000 से अधिक है। घरेलू कीमतों में भी वृद्धि देखी गई, जिससे उपभोक्ताओं की चिंता बढ़ गई।

Web Title : Gas cylinder prices surge after petrol-diesel; check latest rates.

Web Summary : LPG prices rise, impacting households and businesses. Despite supply concerns easing with a successful tanker passage, commercial cylinder rates have significantly increased, exceeding ₹2000 in some cities. Domestic prices also saw a hike, adding to consumer worries.